Popatrao Pawar | पद्मश्री पोपटराव पवारांनी लुटला निसर्ग पर्यटनाचा आनंद
Popatrao Pawar | नगर : दर्शक ।
पद्मश्री पोपटराव पवार यांना नेहमीच अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळेत्यांना निवांत वेळ मिळत नाही,परंतु आज मात्र संध्याकाळी आवर्जुन वेळ काढून त्यांनी नगर जवळील कल्याणरोड येथील ढवळपुरी येथील अंकुर व्हॅली कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली.
या ठिकाणी केलेली निसर्गाची जपणुक राखलेला पर्यावरणाचा समतोल आणि फारसा फेरबदल न करता येथीलच निसर्गरचनेचा आणि संसाधनांचा वापर करून अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे पर्यटन केंद्र उभारल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या शहरांमध्ये राहत असताना प्रत्येकालाच विरंगुळ्याचे आणि निवांत क्षण हवेहवेसे वाटतात आणि आजकाल मध्यमवर्गीय माणुस सुध्धा शरीर आणि मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी पर्यटनाचा आनंद घेतात.
आजकाल महाबळेश्वर लोणावळा अशा प्रसिद्ध ठिकाणी जाणे जाताना होणारा प्रवास रस्त्यावर असणारं ट्राफिक आणि तिथे असणारी गर्दी हुल्लडबाजी यामुळे जवळील पर्यटन केंद्रास लोक पसंती देतात. आणि अंकुर व्हॅली हे नगरपासुन अतिशय जवळ असलेले रमणीय ठिकाण वन डे व्हॅकेशनसाठी नगरकरांच्या पसंतीस उतरत आहे.
पोपटराव पवार यांचे संध्याकाळी अंकुर व्हॅली येथे आगमन झाले डॉ.राजेश भनगडे यांनी त्यांचे स्वागत केले. आल्यानंतर त्यांनी संपुर्ण परिसरात फेरफटका मारुन सर्व ठिकाणची असणारी पुर्वस्थिती झालेला बदल त्यासाठी केलेलं काम याविषयी सखोल माहिती घेतली तसेच अनेक निरीक्षणेही नोंदवली.त्याचप्रमाणे मार्गदर्शनही केले यावेळी त्यांच्या अभ्यासु वृत्तीचे दर्शन झाले.
अंकुर व्हॅली येथे साहसी पर्यटनामधील झिपलाईन झिपसायकल स्काय रोलर झुलता पूल आर्चरी नेट क्लायबिंग असे अनेक खेळ उपलब्ध आहेत मुळातच स्पोर्टमन असल्याने त्यांनी झिप सायकलचाही आनंद लुटला.
या परिसरात फेरफटका मारताना अनेक ठिकाणी फोटोग्राफीचाही आनंद घेतला.संध्याकाळी निवांत तळ्याकाठी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी घेऊन अनेक आठवणी ठेवून ते बाजारहिवरेकडे रवाना झाले,यावेळी त्यांचे समवेत रंगाशेठ रोहोकले,बबलुशेठ रोहोकले, डॉ.संजय बांडे तसेच हिवरे बाजार येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com