Satkar | राज्यस्तरीय प्रशंसनीय कामगिरीची दखल : अभियंता प्रल्हाद पाठक यांना गौरवपत्र प्रदान
राज्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सुधारणा व प्रभावी कार्यवाहीस प्रोत्साहन देण्यासाठी "१०० दिवसांची विशेष मोहीम" हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत शेवगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय निवडीत स्थान पटकावले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-समंतकर यांच्या हस्ते हा गौरवपत्र दिनांक २९ मे २०२५ रोजी प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे शेवगाव उपविभागाच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर अधिकाधिक दखल घेतली जात आहे. प्रल्हाद पाथक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य हे इतर उपविभागांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.
अहिल्यानगर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यां प्रसंगी उप कार्यकारी अभियंता ए. एस. तारगे, उपाभियंता जावेद सय्यद, रियाज शेख, प्रकाश थोरात आदी. उपस्थित हो

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com