Release of child labors | नगर सहाय्यक कामगार आयुक्त व बालकल्याण समिती आणि अमृतवाहिणी, ग्रामविकास मंडळ यांच्या प्रयत्नामुळे 15 बालमजुरांची सुटका
नगर : दर्शक ।
20-06-2025 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांना बालकल्याण समिती यांच्याकडुन प्राप्त झालेल्या पत्रानुसार शासनाने गठित केलेल्या वृतीदरा मार्फत 20 तारखेला बाल कामगार यांची मुक्तता करण्या कामी धाडसत्र आयोजित करण्यात आले होते.
थोडक्यात हकिगत अशी की MIDC पोलिस ठाणे नगर यांच्या मार्फत 2 अल्पवयीन बालके सनफार्मा कंपनी समोर फिरत असल्याची माहिती नुसार MIDC पोलिसांनी सदर अल्पवयीन बालकांना वय अंदाजे 8 व 10 यांना बालकल्याण समिती नगर यांच्या समोर 12 -06-2025 रोजी उपस्थित केले असता, समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी समुपदेशन करुन बालकांशी सखोल चर्चा केली.
निदर्शानास असे आले की सदर बालके यांना तांडयावर मालकाकडे मजुरी करत असताना जबर मारहाण झाली त्यामुळे ते पायी चालत नगर MIDC क्षेत्रात आले असे सांगुन इतर बालमजुरांबद्दल माहिती दिली की अजुन साधारण 15 आमचे साथिदार ही बालमजुर म्हणुन संबंधित मालका कडे कईक दिवसापासुन ठेवण्यात आले होते.
तसेच त्यांच्या बरोबर अजुन 15 बालके अंदाजे वय 8 ते 12 यांना देखिल बालमजुर म्हणुन संबंधित ठिकाणी शेळ पालने, गुर चारने, भांडी घासणे, धुन धुने, आपल्या लहान मुलांना सांभाळने आणि वेळेला पाय चेपुन घेणे अशी कामे करण्यासाठी तसेच अती महत्वाचे म्हणजे तांडयावरील मालकांच्या कर्नाटक येथिल कोळसाखाणी मध्ये सर्व बालकांचे पालकांना कोळसा पाडणे कामी कामावर ठेवण्यात आलेले असुन ते काम सोडुन जाऊ नये म्हनुन या सर्व बालकांना जनु ओलिस ठेवलेले आहे.
हि बाब समजतात बालकल्याण समिती नगर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त मा.जिल्हाधिकारी नगर, मा.पोलिस अधिक्षक यांना सदर माहितीची चौकशी करुन बालकांची सुटका करणे महत्वाचे आहे, हे पत्राद्वारे सांगितले. त्यानुसार सहाय्यक बालकामगार आयुक्त यांनी शासनाने गठीत केलेल्या वृतीदला मार्फत 20 जुन रोजी पहाटे 5 वाजता धाडसत्राचे आयोजन केले तसे पत्र विभागांना दिले.
त्यानुसार 20 जुन ला सकाळी 7.15 मि. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे संदीप हरमळकर, ललीत दाभाळे, उद्यकुमार सुर्यवंशी, सौरभ हामंद, बालकल्याण समिती च्या सदस्या ॲड अनुराधा येवले, अमृतवाहिणी ग्रामविकास मंडळ संस्थेचे दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयुरी वनवे, म.न.पा.चे वतीने आशिष हंस, पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने ए.स.आय.अजय बेरड,
जालिंदर माने, अशोक लिपने, रमाकांत गावडे, म.पो.का.ज्योती शिंदे, चाईल्ड लाईन चे राहुल वैराळ, हे कारवाही मध्ये सहभागी होऊन यांनी सेवालाल तांडा, गहुखेल ता.आष्टि, जि.बीड, येथे सतर्कतेने धाडसत्र पूर्ण करुन 15 बालमजुरांची सुटका करुन धाडसतत्रासाठी गेल्यावर अगदी शेवटच्या टप्यात 5 कि.मी. अंतरावर तांड्या मध्ये गेल्यानंतर सदर ठिकाण अ.नगर च्या क्षेत्रात नसुन ते बीड जिल्ह्याचे क्षेत्रात आहे.
असे लक्षात आले परंतु बालकांची काळजी व संरक्षणच्या दृष्टीने सदर धाडसत्राची कारवाई अती महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन बालमजुरांची सुटका करुन अंभोरे पालिस ठाण्या मध्ये नोंद करुन सुपूर्त केले. सदर बालकांच्या पुनर्ववसना साठी व मुलांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही साठी सर्व बालके मा.बालकल्याण समिती अध्यक्ष व सदस्य बीड यांच्या समोर उपस्थित केले त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर रेवनात दिसले यांनी माननीय सहाय्यक कामगार आयुक्त बीड यांच्याशी त्वरित पत्र व्यवहार करून सदर धाडसत्रबाबत सविस्तर माहिती दिली.
सदरच्या कार्यवाही मध्ये मा.सहाय्यक कामगार आयुक्त, मा.पोलिस अधक्षिक सो., मा.बालकल्याण समिती अध्यक्ष सदस्य, अमृतवाहिणी ग्राम विकास मंडळ संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com