Satkar Nagar | विधी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे विधार्थांचे सन्मान व वृक्षारोपण
शिक्षण आणि कामासोबत सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सदर विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
अॅड. सानिया नफिस चुडीवाला (एल एल बी)अॅड. अरीबा फ़ारुक शेख (एल एल बी)अॅड. नोमान अज़िम जहागिरदार ( एल एल बी) त्याचबरोबर १२ वी वाणिज्य विभागात, अहमदनगर महाविद्यालयात विशेष प्राविण्यासह प्रथम आलेली कु. निदा इकबाल चुडीवाला हिचा देखील सत्कार करण्यात आला व झाडे भेट देण्यात आली.
याप्रसंगी शरद पवार होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रिज़वान अहमद, मिनर्व्हा इन्फ्राचे इंजि. अनिस शेख, नगरसेवक असिफ सुलतान,जेष्ठ विधीज्ञ फ़ारुक बिलाल,समाजसेवक नफ़िस चुडीवाला, जी.ए. एजन्सी चे अज़िम जहागिरदार, डॉ.रेश्मा रिज़वान, अॅड. साजिया सय्यद, जोधपूर येथून आलेले हैदर अली उपस्थित होते.
कर्मयोगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सदस्य जेष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. एम् के शेख यांनी सर्व यशवंताना पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.
यावेळी विद्यार्थ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मयोगी प्रतिष्ठानचे माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफ़िक मुन्शी, पत्रकार मोहसीन बारुदवाले, डॉ.इमरान शेख, समिरखान यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com