Shrirampur News | सैनिक सन्मान पंधरवाडा नियोजन बैठक संपन्न !
शासनाच्या वतीने १६ जुन ते ३० जुन सैनिक पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याने श्रीरामपूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय श्रीरामपूर याठिकाणी बैठक संपन्न झाली.
बैठकीत माजी सैनिकांनी रस्ता केस,तसेच एका आजी सैनिकाच्या घरी २१ तोळे सोन्याची धाडशी चोरी होऊन चार महिने उलटले तरी देखील त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही, त्या चोरीचा योग्य तपास होऊन सेवारत सैनिकास न्याय मिळावा, फेर रद्द करणेबाबत लेखी तक्रार, सैनिक कॉलनी मधील प्लॉट शासनाच्या वतीने माजी सैनिकांना सन १९८० या काळात दिले आहेत परंतु ज्या माजी सैनिकांनी अटी शर्तीचा भंग करून परस्पर ९९ वर्षाच्या करारावर काही प्लॉट सिव्हिल लोकांना विक्री केले आहेत आणि तेच लोक तेथे असलेल्या माजी सैनिकांना नाहक त्रास देत आहेत,
त्याची शासन स्तरावरून योग्य प्रकारे चौकशी करून गरजु माजी सैनिकांना फेर वाटप करण्यात यावे, विविध प्रकारचे प्रश्न लेखी तक्रार अर्जाच्या स्वरूपात नवनियुक्त नायब तहसीलदार श्री राजेश पाऊंड यांच्याकडे दाखल केले. शासन निर्णयानुसार घरपट्टी मधील संकलीत कर माफ असुनही गेले दोन,तीन वर्षांपासून संकलीत कर हा घरपट्टी मध्ये लागुन येतो आणि विचारणा केली असता वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे असे सांगून वेळ मारुन नेली जाते.
संकलीत कर व शास्ती भरु नका फक्त बाकी रक्कम भरा असे वसुली अधिकारी सांगतात व पुन्हा शास्ती लावून पट्टी आकारली जाते, सुरवातीला माजी सैनिक असल्याचा सैनिक कल्याण कार्यालयाचा दाखला सर्व माजी सैनिकांनी दिलेला असतांना दरवर्षी पुन्हा पुन्हा मागणी केली जात आहे, एकीकडे संपूर्ण देशभर सैनिकांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते व दुसरीकडे सैनिकांना नाहक त्रास दिला जातो.
त्यामुळे याबाबत नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय (प्रांत) अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी यावर निर्णय घेऊन माजी सैनिकांची हेळसांड थांबवावी तसेच ज्या आजी - माजी सैनिकांची कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील त्यांनी या सैनिक सन्मान पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत
मा.तहसीलदार श्रीरामपूर यांचे नावे तक्रार अर्ज दाखल करावेत व आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावेत असे माजी सैनिक समितीच्या वतीने मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस मेजर कृष्णा सरदार, राजेंद्र कांदे,श्रीमती छाया मोटे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब उंडे, वीर पिता विष्णू बडाख, वीरमाता सौ,इंदूबाई बडाख, मिनानाथ गुलदगड,संजय बनकर,शरद तांबे, मच्छिंद्र शेळके इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत प्रसिद्धी
सहयोग समता
मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com