Bagul Pandagu Nagar | पद्मशाली समाजाचा वैशिष्टयपुर्ण सण बागुलापडुंगू 11 जुलै रोजी साजरा होत आहे : स्वाती सिरसुल
नगर : दर्शक । Bagul Pandagu Nagar |
अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेला पद्मशाली समाजाचा वैशिष्टयुपर्ण बागेचा सण अर्थात बागुलापडंगू येत्या शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी साजरा होत असल्याची माहिती पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी दिली.
बागुलापडुंगा सण आषाढ महिन्याच्या पौणिमेनंतर येणा-या पहिल्या शुक्रवारी साजरा करण्याची पुर्वांपार परंपरा चालु आहे. आषाढ महिन्यामध्ये पावसाळा सुरु झाल्यामुळे हवामानाच्या होणा-या बदलांमुळे संसर्गजन्य रोगरांईपासुन सर्व मानवजातीला मुक्तता मिळावी या साठी निसर्गात जाऊन देवदेवतांची पूजाअर्चा करुन विशेषतः शितळा देवी (पोशम्मा तल्ली) व लक्ष्मी आई (लक्षम्मा तल्ली) या दोन देवींची सहवाद्य मिरवणुक काढुन पुजा अर्चा केली जाते. हल्लीच्या काळात शहर विस्तारीकारणामुळे सिमेंट काँक्रीटची जगंले उभी असल्यामुळे जगंल झाडी कमी झाल्यामुळे अलीकडे हा सण प्रत्येकजण आपल्या घरीच साजरा करतात.
नगर मध्ये तोफखाना भागातील मोचीगल्ली येथील शितळा आई देवीची (पोशम्मा तल्ली) यांचे मंदिर असुन तेथे सकाळपासुनच भाविक महिला व पुरुष मोठ्या भक्तीभावाने देवीला अभिषेक घालुन नैवैद्य देऊन पुजेला सुरुवात होते तसेच बालिकाश्रम जवळ जाधव मळा येथील लक्ष्मी आई (लक्षम्मा तल्ली) मंदिर यांच्या मंदिरामध्ये सहवाद्य मिरवणुकीने जाऊन पुजा अर्चा करण्यात येते. या सणाचे वैशिष्टय म्हणजे हा सण फक्त नगर मध्ये साजरा केला जातो
हा सण आंध्र प्रदेश व तेलंगाना राज्यातील तमाम पद्मशाली समाज साजरा करत असल्याची माहिती जुने जाणते पुरोहित श्री. विश्वनाथ बोडखे यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई, पुणे, सोलापुर, जालना व इतर सर्व ठिकाणी हा सण पोशम्मा पडुंगा या नावाने आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या सोयीनुसार शक्यतो रविवार सुट्टीच्या दिवशी साजरा केला जातो. फक्त नगर मध्येच हा सण पौर्णिमेच्या येणा-या शुक्रवारीच का साजरा करतात व कधीपासुन ही प्रथा सुरु झाली या बद्दल फारशी स्पष्टता नाही.
पद्मशाली समाज आजही बहुसंख्येने तोफखाना, बागडपट्टी, पापय्या गल्ली, रंगारगल्ली, झारेकरगल्ली, माळीवाडा, दातरंगे मळा, बालिकाश्रम रोड, श्रमिक नगर, पद्मा नगर, नित्यसेवा सोसायटी, उपनगरातील ब-याच भागात पद्मशाली समाज राहत असुन त्या त्या भागातील शितळा देवी मंदिरात जाऊन हा सण साजरा करतात.
बागुलापंडूगू सणानिमित्त तमाम पद्माशाली समाजाला पद्माशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती सिरसुल तसेच पद्माशाली समाज महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुनिता कुरापट्टी व माजी अध्यक्षा ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. शामला ताई बोरा, रंजना क्यादर, लता पुलगम, शारदा सुंकी, विजया बोडखे, रुक्मीणी संदुपटला, भारती सुरम, अंबिका बोगा, ज्योती बिज्जा, पद्मा म्याना इ. महिला कार्यकर्त्यांनी समाज बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com