LLB Exam | कु. वैदेही रासने हिचे कायद्यात परिक्षेत प्रथम श्रेणीने यश
नगर - कु. वैदेही रवि रासने हिने कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण शहराचा अभिमान वाढविला आहे. पुण्यातील नामवंत मॉडर्न लॉ कॉलेज येथून पाच वर्षांचा बी.ए. एलएल.बी.पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करत वैदेही हिने आपली जिद्द, चिकाटी आणि शैक्षणिक प्रगती यांचा उत्तम प्रत्यय दिला आहे.
तिचे वडील रवि अशोक रासने हे सुरभि कलेक्शन (मोबाइल व कम्प्युटर अॅक्सेसरीज) या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर कार्यरत आहेत. आपल्या शिक्षणप्रवासात वैदेहीने नेहमीच अभ्यासात सातत्य राखले, तसेच शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला.
वैदेहीच्या या यशाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. नातेवाईक, शिक्षक, मित्र परिवार व परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात व्यक्त वैदेही सांगितले की, या यशामागे माझे आईवडील, मार्गदर्शक प्राध्यापक, माझ्या अभ्यासात सातत्याने पाठिंबा देणारे मित्रमैत्रिणी आणि माझ्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे मोलाचे योगदान आहे. मी सर्वांची मनापासून आभारी आहे.
भविष्यात मास्टर ऑफ लॉ आणि पीएच.डी. करण्याची तिची इच्छा असून, कायद्याच्या क्षेत्रात काम करताना गरजूंसाठी आणि स्त्रियांच्या प्रश्नांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करायचे आहे, असे तिचे स्पष्ट मत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com