Market Yard Chowk | डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण २७ जुलैची तयारीची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी

Market Yard Chowk | डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा आ.जगताप यांनी केली पाहणी




           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब्रॉन्झ धातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलै रोजी अनावरण होत आहे. साडेदहा फूट उंच असलेला हा पुतळा साडेआकारा फुटांच्या चौथऱ्यावर बसविला जाणार आहे.




 पुतळा भवतालच्या परिसराचीही आकर्षक सजावट करण्यात आली असून या कामासाठी सुमारे ८५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.




      नगर शहरातील मार्केटयार्ड जवळील चौकात हा पुतळा उभारण्यात आला  आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 





यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. शनिवारी जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त आयुक्त यशवंत डांगे व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळींनी पुतळा परिसराची पाहणी करत अनावरण कार्यक्रमाचे नियोजन केले. 




याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाडसुरेश बनसोडे,अजय साळवेविजय भांबळसुमित गायकवाड,जेव्हियर भिंगारदिवेविजय गव्हाळेकिरण दाभाडेअमित काळेसिद्धार्थ आढावपरिमल निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.