Sanman | विवेक विचार मंच व बार्टीच्या वतीने काळोखे यांचा सन्मान 

Sanman | विवेक विचार मंच व बार्टीच्या वतीने काळोखे यांचा सन्मान




           

नगर : दर्शक । 

   नगर येथील सामाजिक कायकर्ते चंद्रकांत  काळोखे यांना राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज नगरमध्ये सारडा कॉलेज सभागृहात विवेक विचार मंच व बार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते काळोखे यांचा सन्मान करण्यात आला.




 यावेळी  प्रमुख वक्ते  सागर शिंदे,संयोजक विवेक विचार मंच ,महाराष्ट्र राज्य  हे होते तर  अमोल भारती,जिल्हा पोलीस उपाधीक्षक,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू साबळे,




सत्कारमूर्ती क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र सदस्य चंद्रकांत काळोखे,समरसता मंचचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत खजिनदार,मातंग परियोजना  प्रांतचे अधिकारी निशांत नन्नवरे,सामाजिक कार्यकर्ते  राम वडागळे,सुनील उमाप,नाना साबळे,सागर खरे,डॉक्टर सुनील पवार,विजय वडागळे,सुनील सकट आदी मान्यवर सह मोठ्या संख्नेने नगरकर  उपस्थित होते.



          चंद्रकांत काळोखे हे मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.भावीज्ञानी ग्रामीण युवा कला क्रीडा संकुल कर्जत व भानुविश्व ज्ञानयोगी निकेतन संस्थांचे अध्यक्ष असून गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटन संस्थेचे संस्थापक आहेत.



त्यांनी समाजकार्यास प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणतांबा शाखेतून केला.पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले.त्यांनी सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली आहे