Satkar | शैक्षणिक गुणवत्तेमुळे पारनेरकरांची सर्व क्षेत्रात यशस्वी झेप - अविनाश घुले
नगर – पारनेर मित्र परिवाराच्यावतीने हमाल पंचायत भवन, अ.नगर येथे नुकताच गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. पारनेर तालुका कायम दुष्काळी असला तरी तेथील लोक कष्टाळू असून त्यांना बुद्धीची देणगी लाभलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेमुळेच अनेक उच्च पदांवर पारनेरकर दिसतात. सर्वात जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकतात, तसेच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत पारनेरकरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाची सुरुवात सेनापती बापट यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. गेल्या वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक सदानंद सोनवणे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार तारकराम झावरे यांनी केला.
याप्रसंगी 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतात 673वा क्रमांक मिळवून भारतीय राजस्व सेवेत निवड झालेल्या ओंकार राजेंद्र खुंटाळे यांचा विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश प्राप्त केले आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आर्कि. आदेश ठाणगे, सौ. शकुंतला पवार, ओंकार सातपुते यांची भाषणे झाली. या प्रसंगी संजय खामकर, बबनराव झावरे, अशोक बाबर, इंजिनिअर भास्कर हांडे, बाळासाहेब कोळी, आर्कि. दत्तात्रय शेळके, वसंत देशमुख, आप्पासाहेब पानमंद, पारुनाथ ढोकळे, ज्ञानदेव तिकोणे, भाऊराव गायकवाड, कृष्णा वाबळे, मा.नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणगौरव सोहळ्याचे नियोजन व सूत्रसंचालन सचिव प्रा. किसनराव पायमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ॲड. युवराज पाटील यांनी मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com