नगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखीचे प्रस्थान


 

        


नगर : दर्शक ।   

दरवर्षी  प्रमाणे याही वर्षी श्रावणमासा निमित्त श्री साईदास परिवार ट्रस्टच्या वतीने अहमदनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखीचे शमी गणपती मंदिर,दिल्लीगेट येथून प्रस्थान झाले. पालखीत ६०० च्या वर  साईभक्त सहभागी झाले असून  पालखी मंगळवार दि.१७ ऑगस्ट रोजी शिर्डीस पोहचणार आहे.

 



     तत्पूर्वी काल संध्याकाळी शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक सोहळा दाळमंडईविठ्ठल मंदिर येथून ते दिल्लीगेट पर्यंत  काढण्यात आला होता यावेळी  साईदास महाराज,जिन्यासानंद सरस्पती महाराजमंगल वराडे,सुरेश वाबळे,विश्वस्त साई संस्थान शिर्डी , सचिन जगतापविधाते सर,गणेश कवडे ,अश्विनी जाधव आप्पा नळकांडेसागर मुर्तडकर,दत्ता जाधव,नीता लोखंडे आदी मान्यवरांसह  मोठ्या संख्नेने  लोकप्रतिनिधी,नगरसेवक व साई भक्त उपस्थित होते 

 



            पालखी प्रस्थान  आज  सकाळी ६ वा.शमी गणपती मंदिर,दिल्लीगेट येथे साई पादुकांवर अभिषेक व यथासांग पूजा श्री.व सौ.सौरभ दारकुंडे  आणि श्री.व सौ.राजशेठ जाधव यांच्या हस्ते होऊन पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले नंतरअल्पोपहार तलाठी संकुल समोर,सावेडी चहापाणी व नाष्टाचे व्यवस्थापन  महेशशेठ केवलरामाणी यांनी केले




 दुपारी  साईमंदिरसाईश्रध्दा कॉलनीनागापूर येथे माध्यान्ह आरतीभोजन आणि विसावा झाला  याचे  व्यवस्थापक बावके साहेब व साई मंडळ यांनी केले  साईदास परिवार ट्रस्ट आयोजित साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे हे २२ वे वर्ष आहे.