अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्यावतीने महाप्रसाद वाटप ; असंख्य भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
नगर : दर्शक ।
अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुलात पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने भगवान शंकाराची व महर्षी श्री मार्कंडेय महामुनींची महाआरती करुन महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 3000 भाविकांनी लाभ घेतला. यावेळी भगवान शंकर व महर्षी श्री मार्कंडेय महामुनींच्या मूर्ती आकर्षक सजावटीत मांडण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला.
अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त भगवान शंकाराची व महर्षी श्री मार्कंडेय महामुनींची पद्मशाली महिला फाउंडेशनचे सौ.अश्विनी सुंकी, सौ.श्रृतिका बल्लाळ, सौ.पुजा गुंडू, सौ.गायत्री बुरगुल, सौ.नुतन सुंकी, सौ.शिवानी सुंकी, सौ.प्रिती अवधुत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे हजारो भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसादासाठी विशेष आकर्षण ठरलेले भात-वरण (दालचा), शिरा यावेळी भक्तांना देण्यात आले.
गेल्या सात वर्षांपासून पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्ट या महाप्रसाद उपक्रमाचे सातत्याने आयोजन करत आहे. यंदाही शहरातील विविध भागातील भाविक, भक्त आणि मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने 12 वर्षापासून विविध सामाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येते आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, वृक्षरोपण कार्यक्रम, महाआरती उपक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना किराणा वाटप, गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर व दप्तर वाटप असे उपक्रम फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येतात असे सांगून तसेच पीएसआय अनिल अलवाल यांच्या पुढाकाराने युवक व युवतींना स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र पद्मशाली फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आले, असे फाऊंडेशन वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्ट व पद्मशाली महिला फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com