स्वातंत्र्य दिवस निमित्ताने अल-करम हॉस्पिटलमध्ये औषधो उपचार सह मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन 






नगर : दर्शक । 
 अल-करम हॉस्पिटलच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी  सकाळी 10 ते 02 वाजे पर्यंत अल करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल जवळ, रविराज आर्केड किंग्ज् गेट रोड, अहमदनगर येथे मोफत सर्वरोग निदान उपचार व औषधांसह शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तौफिक तांबोळी यांनी सांगितले.




यामध्ये मोफत ओ.पी.डी., ई.सी.जी., शुगर तपासणी, उपलब्धते नुसार औषधे दिली जाईल.
सोनोग्राफी, ऐक्स रे, लॅब टेस्ट ईत्यादीवर  30% ते 50% पर्यंत सवलत दिली जाईल असे डॉ.जहीर मुजावर यांनी सांगितले.




या शिबिरात जनरल सर्जन (हार्निया, अपेंडीक्स व इतर सर्व शस्त्रक्रिया) कार्डियाक (कॅथलॅब, अॅन्जीओप्लास्टी)युरोलॉजी (डायलिसीस, किडनीस्टोन,प्रोस्टेट सर्जरी) मेडिकल (डायबेटिस, ह्यदयाचे आजार, स्ट्रोक, ब्लडप्रेशर) आर्थोपेडिक (सांधेदुखी, पाठदुखी, सांधे प्रत्यारोपन) स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र (वंध्यत्व निवारण, वेदनाविरहीत प्रसुती)



 बालरोग व नवजात रोगशास्त्र ऑन्कोलॉजी (सर्जन व किमोथेरपी) पॅथॉलॉजी रेडिओलॉजी सिटीस्कॅन आदीं आजारांची तपासणी डॉ. जहीर BAMS, MSc, PhD,Medical Pharmacology,डॉ. नजमा जहीर BUMS, CCH, CGO (स्त्रीरोग / वंध्यत्व निवारण),डॉ. जैनब पटेल M.B.B.S., M.S.(Surgeon),डॉ.अशपाक पटेल M.B.B.S., MD.(Medicine), हे डॉक्टर करणार असल्याचे डॉ अशपाक पटेल यांनी सांगितले.



तरी या संधीचा  सर्वांनी फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी या नंबर वर9860708016 /9921991492/0241-2423333 संपर्क करावे असे आवाहन शेरअली शेख यांनी केले आहे.