अहमदनगर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा दिमाखदार यशस्वी ठसा – पाच विद्यार्थी सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण




नगर : दर्शक । 

 अहमदनगर महाविद्यालयातील वाणिज्य शाखा व संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे,  वाणिज्य विभाग प्रमुख सीए. डॉ. परेश बोरा, वाणिज्य संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रवींद्र देशमुख, प्रा. आनंद रायकवाड प्रा.  शबनम गुरुंग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.  




      सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सीए चैतन्य दिलीप साळवे, सीए अमान रफिक शेख, सीए ऋषभ मुथा, सीए अनुज संजय गांधी, सीए सय्यद मोहम्मद मोहासिब या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कठोर अभ्यास, चिकाटी, शिक्षकांचे मार्गदर्शन व महाविद्यालयीन पाठबळ यांचा मोलाचा वाटा आहे.  



    वाणिज्य विभागप्रमुख सीए.डॉ. परेश बोरा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांना, त्यांच्या जिद्दीला मिळालेले हे यश आहे, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचे तसेच त्यांच्या  पालकांचे नाव नक्कीच मोठे झाले आहे, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.  



       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि स्थिर चित्त अत्यंत गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांनी त्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.      



 तसेच, सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही महाविद्यालयात सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, CA Foundation आणि CA Intermediate परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 



सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी सचिन बोरा(F.Y.B.Com), राज चांगेडिया, कृष्णा किशोर कुलकर्णी आणि वैश्नवी तावडे (S.Y.B.Com) यांचा समावेश आहे. तर सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भक्ति दीपक गांधी (S.Y.B.Com – ग्रुप १), यश सहानी (T.Y.B.Com – दोन्ही ग्रुप) आणि आयुष संजय गांधी (CA Inter AIR 44) तसेच श्रेया घोरपडे (UGC NET) या विद्यार्थ्यांची नावे अग्रगण्य आहेत.     



   या सर्व विद्यार्थ्यांचा वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्रातर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अभ्यासाचे पोषक वातावरण आणि पालकांच्या पाठबळाला दिले. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.