स्नेहा पाठक ठरल्या पैठणीच्या पहिल्या मानकरी, द्वितीय पूजा गीते,तृतीय अमृता कांबळे
नगर : दर्शक ।
भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सवा निम्मित दिल्लीगेट येथील भगवान जिव्हेश्वर मंदिर प्रागंणात स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ,बागडपट्टी व भगवान श्री जिव्हेश्वर मंदिर,दिल्लीगेट पटांगण यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये प्रथम क्रमांक स्नेहा विक्रम पाठक(१२ हजार रुपयांची पैठणी)यांनी तर द्वितीय क्रमांक पूजा वैभव गीते (आठ हजार रुपयांची पैठणी) तर तिसरा क्रमांक अमृता दीपक कांबळे (पाच हजार रुपये पैठणी) यांनी मिळवला.तसेच सहभागी ५० स्पर्धकांना सहभागाबद्दल पारितोषिक देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्नेने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
प्रसिद्ध निवेदक चेतन गायकवाड व त्यांच्या टीमने याचे संचालन केले.तर जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक प्रकाशभागानगरे,बालीशेठ बांगरे
सचिन जगताप यावेळी बोलताना म्हणाले महिलांसाठी होम मिनिस्टर या खेळाच्या माध्यमातून महिलांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी समाजाने उपलब्ध केली आहे. पैठणीच्या खेळाला आनंद व एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.महिला कार्यक्रमाला आल्यानंतर होम मिनिस्टर पैठणीचा खेळ असला तर हा दुग्ध शर्करा योगच असतो. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हे महिलांसाठी व्यासपीठाच आहे.
दरवर्षी भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने शहरात साजरा होत आहे.यानिमित्त समाज एकत्रीकरण होते असे हि ते म्हणाले.
महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा ,होम मिनिस्टर कार्यक्रम अभूतपूर्व उत्साही वातावरणात पार पडला.मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला.दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली.उखाणे,रिंग,चेंडू फेकणे,लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शे
संगीताचा ठेका व उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. १८ वर्षांपासून ते ६० वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या.स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com