सावेडीत रुद्राभिषेक सोहळा व स्वामी समर्थांचे अनुष्ठान संपन्न
नगर : दर्शक ।
सावेडी येथील गावडे मळा,पाईप लाईन रोड येथील जिव्हेश्वर शिवालय मंदिरात श्रावण महिन्याच्या निम्मिताने सलग तिसऱ्या वर्षी भगवान जिव्हेश्वर दरबारात रुद्राभिषेक सोहळा व स्वामी समर्थांचे अनुष्ठान सह विविध कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती आयोजन वैभव आहेर यांनी दिली
जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाच्या या मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे पवित्र श्रावण मास निमित्त सकाळी अभिषेक,स्वामी समर्थाचे अनुष्ठान अभिषेक सुखदेव शेडाळे,मंगल शेडाळे,राजेंद्र शेडाळे ,ऋतिका शेळके. आशुतोष शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.स्वामी समर्थांचा अनुष्ठांचा कार्यक्रम संपल्यावर आमटी भाकरीचा महाप्रसादआयोजित करण्यात आला होता यासाठी शेडाळे परिवाराने मोठे योगदान दिले .
यावेळी प्रमुख पाहुणे सचिन जगताप,माजी महापौर बाबासाहेब वाकळे अनिलभाऊ बोरुडे, संपत बारस्कर,संजय
झिंजे, सागरभाऊ मुर्तडक,विजय पुंडे गुरुजी,श्रीमती नलिनी कनोरे,मंदिराच्या अध्यक्षा मृणाल कनोरे,प्रकाश मारवाडे,मंदा पिंपरकर,सोमनाथ सोमनाथ खाडे स्वामी समर्थ प्रतिष्टानचे पदधिकारी ,गणेश झिंजे, योगेश ठुबे,महेश कांबळे,बाबासाहेब गेरांगे,अमोल गायकवाड,आकाश आतकरे आयोजक वैभव आहेर,स्नेहल कौसल्ये, वृषाली भूमकर, आदींसह मोठ्या संख्नेने भाविक व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,प्रेरणास्थान स्व.श्रीनिवास जयकुमार कनोरे यांच्या प्रतिमेचे हि पूजन करण्यात आले,स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ,,भगवान जिव्हेश्वर मंदिर, दिल्लीगेट,जिव्हेश्वर तरुण मंडळ,स्वकुळसाळी महिला मंच,जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, जिव्हाळा प्रतिष्ठान,माता अंकिनी दशांकिनी महिला मंडळ, सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य तसेच स्वामी समर्थ अनुष्ठान ग्रुप बागडपट्टी,निलेश मरकड,स्वप्नील गायकवाड,ज्ञानेश्वर पोतकुले,चेतन महाजन,ओम आहेर,जगदंब मित्र मंडळ,गावडे मळा,मनोहर कलेक्शन(कापड बाजार)यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले
कार्यक्रमा निम्मित मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तर स्वामी समर्थांची आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन मंदिर सजवण्यात आले होते , अनुष्ठानाला महिलांची संख्या लक्षणीय होती ,युवा कार्यकर्ते, समाज बांधव व मित्र परिवार यांनी प्रयत्न केले मंदिराचे पुजारी व युवक अध्यक्ष वैभव आहेर यांनी सर्वांचे आभार मानले
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com