Digital Media | डिजिटल मीडियाच्या उपाध्यक्षपदी एम के न्यूज चे महेश कांबळे
नगर : दर्शक ।
डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या नगर शहर उपाध्यक्षपदी एम के न्यूज चे महेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे तसेच यावेळी कार्यकरणीची निवड निवडीची घोषणा डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, समन्वयक इकबाल शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. सुभाष चिंधे आदी उपस्थित होते.शहरातील हॉटेल व्ही स्टार येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
महेश कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता करत असून त्याना दा प आपटे पत्रकारिता पुरस्कार,पुणे महानगरपालिका,दै सामना, दै लोकसत्ता,संकेत अकॅडमी,पुणे,यांचे पुरस्कार मिळालेले आहेत सध्या ते एम के न्यूज यु ट्यूब चॅनल चालवत आहेत तसेच ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य असून जागतिक साळी फाऊंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत,
प्रतिबिब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी,हिंदी,इंग्र्रजी दैनिकात प्रकाशित झालेले आहेत त्यांनी आचार्य आनंदऋषी महानिर्वाणचे फोटो प्रदर्शन व फोटो क्लबच्या वतीने नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवलेले होते ,अवतार मेहेरबाबा व कोरठण खंडोबा या दोन माहिती पटाची त्यांनी निर्मिती केलेली आहे निवड झाल्याबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com