चिचोंडी पाटील येथील 51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी 12 वर्षानंतर सरोदे परिवाराला मिळाला मंत्रालयात न्याय





 



नगर- 




तालुक्यातील  चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या 70 वर्षीय महिला भगिनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या बहुचर्चित ५१ गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षापासून अनेक वेळा तलाठी कार्यालयतहसील कार्यालयप्रांत कार्यालय येथे उपोषण करून ही न्याय मिळत नसल्याने मागील महिन्यात नऊ दिवस घर संसार शेळ्या/मेंढ्या घेऊन सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी नगर तहसील कार्यालय परिसरात बेमुदत आंदोलनाला बसले होते.या शेळी -मेंढी घर प्रपंच घेऊन तहसील कार्यालयात केलेल्या अनोख्या आंदोलनाची जिल्हा भर जोरदार चर्चा झाली होती. 






          नगर तहसील कार्यालयातील आंदोलनाची माहिती युवानेते शिवसैनिक पांडुरंगजी दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम  यांना दिली. गृहराज्यमंत्री कदम  तात्काळ जिल्हाधिकारी व अहिल्यानगरचे तहसीलदार यांना संपर्क करून त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले. बारा वर्षापासून जमीन चोरी प्रकरणी प्रलंबित असणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सदर गाव गुंडाने राजकीय हस्तक्षेप करून प्रशासनावर दबाव आणून  बेकायदेशीरपणे कुठेही खरेदी खत न करता स्वतःच्या नावावर केलेली जमीन परत कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करून देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते. 






         उपमुख्यमंत्री व मा.गृहराज्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेताच आंदोलन स्थळी तहसीलदार साहेबांनी सदर जमीन कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करण्याचा फेरफार दुरुस्तीचा आदेश दिला व अनेक दिवसांपासून सुरू असलेले घर प्रपंच शेळी मेंढी तहसील कार्यालयातील आंदोलन त्वरित थांबले होते. 






      याबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचा धनगर समाजाचे प्रतीक असलेले घोंगडी,पिवळा फेटा,भंडारादेऊन सन्मान केला व सरपंच व सरोदे परिवाराने उपस्थित फुलात्पादन मंत्री भरतशेठ गोगावले,उद्योग मंत्री उदय सामंत आमदार चित्राताई वाघ या सर्वांचे ऋण व्यक्त केले.


       



सरपंच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,गृहराज्यमंत्री योगेश कदम,युवानेते शिवसैनिक पांडुरंग दातीर,अहिल्यानगरचे प्रांत सुधीर पाटील,अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे,तहसीलदार संजय शिंदे  व सर्व पत्रकार सोशल मीडिया बांधवांचे आभार मानले.यावेळी कौसाबाई सरोदेसूर्यभान सरोदे व त्यांचे परिवार,सरपंच शरद पवार,चंद्रकांत पवार,अभिषेक कदम,युवराज हजारे.किरण मोरे आदि  मंत्रालय मुंबई येथे उपस्थीत होते.