ना राधाकृष्ण विखे यांचा जनता दरबारात गीता गिल्डा यांनी मांडले प्रश्न
नगर : दर्शक ।
नगर-पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात भाजपाच्या जेष्ठ नेत्या गीता गिल्डा यांनी नगर शहर प्लास्टिक पोल्युशन पासून मुक्त करणे,महिलांसाठी अद्ययावत प्रसाधनालयाविषयी प्रश्न मांडले व तसे निवेदन दिले यावेळी अॅड.अमोल निस्ताने,संतोष गांधी, महावीर कांकरिया,गोपाळ वर्मा,महेश नामदे,महेश शिर्के,दीपक देहरेकर, सतीश रासने, अनिल निकम,सुरेखा जंगम, नीता फाटक, कावेरी घोरपडे, लीला अग्रवाल, राखी आहेर,सुनिता तावरे व डॉ.दर्शन करमाळकर,रोहित तोलानी आदी उपस्थित होते.
गीता गिल्डा म्हणाल्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाची जागा आहे तिकडे महिलांसाठी अद्ययावत प्रसाधनालय असावे. कारण सर्वसाधारण महिला गावातील आणि बाहेरील जेव्हा खरेदीसाठी येतात तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची अशी सुविधा मिळत नाही अशा वेळेला ही अतिशय निकडीची बाब असते वृद्ध महिला ,लहान मुले ,तरुण मुली यांना सुद्धा कुठेही बाजारपेठेमध्ये अशी सुविधा नाही.याकरिता पालकमंत्र्यांनी दखल घेऊन या जागेचा योग्य तो विनियोग करावा असे म्हटले आहे.
तर दुसरे निवेदनातं म्हटले आहे नगर शहर प्लास्टिक पोल्युशन पासून मुक्त करणे. यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले जसे विविध ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशिंग करता वेंडिंग मशीन बसवणे ,प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करणे, प्लास्टिकचे पण संकलन करणे ,रिसायकलिंग प्लांट जिकडे आहेत तिकडे पोहोचवण्याची सुविधा करणे. यामध्ये असेही सांगण्यात आले की विशिष्ट प्रकारची इको फ्रेंडली माती असते आणि ते कचऱ्याच्या डिगांवर टाकल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये त्या कचऱ्याचे विघटन होते आणि प्लास्टिक कागद याची माती होते व बाकी धातू तसेच राहतात इको फ्रेंडली आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग करावा असा प्रस्तावही आम्ही पूर्वी आयुक्तांकडे दिला होता.
तसेच काही शहरांमध्ये रिसायकलिंग प्लांट आहेत त्याची माहिती सांगण्यात आली,मनपाचे घंटागाडीचे व्यवस्थित नियोजन असावे तसेच नारी भवन संदर्भात प्रस्ताव दिलेल्या आहे याची माहिती देण्यात आली. नगर शहरात प्रचंड प्रमाणामध्ये बचत गट आहेत. त्यांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठी एक उत्तम जागा पाहिजे आहे याकरिता एक सुसज्ज नारी भवन असावे असा प्रस्तावही मागे करण्यात आलेला आहे.
नगर शहरातील महिलांची ही मागणी असल्यामुळे हा प्रस्ताव करण्यात आला होता . नगर शहराला चांगल्या प्रकारे एक उजाळा यावा स्वच्छ सुंदर व्हावं याकरिता असे क्लिनलीनेस ड्राईव्ह असावेत असेहि गिल्डा म्हणाल्या पालकमंत्र्यांनी या करता अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि सांगितले की आम्ही लवकरच आयुक्तांसोबत एक बैठक लावू आणि कशाप्रकारे आपल्याला सुंदर शहर करता येईल यावर जरूर एक प्लॅनिंग करून आणि कार्यवाहीत करू.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com