अखंडित लालटाकी मित्र मंडळ ३ दिवसीय अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न
नगर : दर्शक ।
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अखंडित लाल टाकी मित्र मंडळाच्या वतीने तीन दिवस सलग कार्यक्रम झाले असून यामध्ये धार्मिक गीतांचा व महापुरुषांच्या गीतांच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली.
नगर शहरामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्राचे लाडके गायक अजय भाऊ क्षीरसागर यांच्या गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, विकी इंगळे,चंद्रकांत काळोखे ,सुनील उमाप आदी सह मोठया संख्येने समजा बांधव उपस्थीत होते.
दुसऱ्या दिवशी नगर शहरातून भव्य मिरवणूक व सामाजिक उपक्रम रक्तदान करून 51 बॅग संकलित करण्यात आल्या या उपक्रमामुळे अखंडित लाल टाकी मंडळाचे सामाजिक स्तरात कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी मंडळाचे रामभाऊ वडागळे,सुनील ढोले,सुनील ससाणे,सचिन कनगर, लखन वाघमारे ,गणेश शिरसाठ, राम काते,विनोद शिरसाट, किरण साळवे, अनिल शेलार ,नितीन घोरपडे ,जय वडागळे, अनिकेत भोसले ,शाहूराजे वडागळे ,राकेश ठोकळ ,विजय ढोले, याकब वडागळे, जय भोसले, राजू काळोखे ,अजय वाघमारे ,संजय साळवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले वस्तीतील सर्वच लहान मोठ्यांचा सहभाग लाभला

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com