जिल्हा परिषदेच्या आश्वासनानंतर आरपीआयचे मुख्याध्यापक पगारे अन्याय प्रकरणी उपोषण मागे
नगर : दर्शक
करांडेवस्ती, देहरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास पगारे यांच्यावर अन्यायकारक निलंबनाची कारवाई झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पगारे सरांनी उपाध्यापक किरण चांगदेव रासकर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर, उलटपक्षी पगारे सरांवरच निलंबनाची कारवाई केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आर पी आय च्या वतीने त्या निषेधार्थ उपोषण सुरु करण्यात आले आहे होते जिल्हा परिषदेच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असे तालुका अध्यक्ष अविनाश भोसले यांनी सांगितले
उपोषणाला जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे ,अविनाश भोसले, राहुल ठोंबे, संदेश पाटोळे, रवींद्र पवार, स्पेस पगारे, दीपक पगारे, संजय कांबळे, पोपटराव पगारे, विजय भांबड, किशोर आठवले, अभिजीत साळवे, उत्कर्ष भालेराव, विवेक भिंगारदिवे, माया जाधव, सविता कांबळे, सारिका गांगुर्डे, मनीषा साळवे आदी कार्यकर्ते बसले होते
पगारे सरांवर "सहकार्यांशी समन्वय नसल्यामुळे" निलंबनाची कारवाई करण्यात आली होती पगारे सरांनी शाळेतील आर्थिक गैरव्यवहार ११ जानेवारी २०२४ रोजी लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवला होता. यामध्ये रासकर यांनी शाळेच्या खात्यातून ४१,४२१ रुपयांचा अपहार केल्याचा उल्लेख आहे. तसेच शाळेच्या शिक्क्याचा गैरवापर व जातीचा उल्लेख खाडाखोड करणे यांसारख्या गंभीर प्रकारांची माहिती देण्यात आली होती. मात्र, संबंधित उपाध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नाही.
जिल्हा परिषद अहिल्यानगर, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांनी सुनिल साळवे, जिल्हाध्यक्ष, आर. पी. आय (आठवले गट), व अविनाश भोसले, नगर तालुकाध्यक्ष; पी.आय. अहिल्यानगर दिलेल्या पात्रता म्हटले आहे कि विलास शंकर पगारे (मुख्याध्यापक जि.प.प्राथ. शाळा करंडेवस्ती देहरे ता.जि.अहिल्यानगर यांच्यावर झालेले अन्यायाविरुद्ध संबंधितांवर कारावाई करणे बाबत.
आपले दि.29/07/2025 रोजीचे निवेदन प्रस्तुत विषयानुसार आपण कार्यालयास सादर केलेले दि.29/07/2025 रोजीचे निवेदनातील मुद्यांचे अनुषंगाने श्री. किरण चांगदेव रासकर, प्राथमिक शिक्षक जि.प.प्राथ. शाळा करंडेवस्ती, देहरे ता.जि.अहिल्यानगर यांचे बाबत व श्री. विलास शंकर पगारे सेवा निलंबीत प्राथमिक शिक्षक यांचे बाबतचे तक्रारींची चौकशी करण्या बाबत दि.05/08/2025 नुसार समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीस आपले प्राप्त निवेदनातील मुद्यांचे अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात बाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणी चौकशी समितीचे अहवालाचे अनुषंगाने संबंधितावर नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल. करिता आपण दि.05/08/2025 पासून करत असलेले उपोषणापासून परावृत्त व्हावे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी लेखी दिले आहे यानंतर उपोषण मागे घेण्यात आले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com