पद्मशाली सोशल फाउंडेशनतर्फे शहरातील विविध शाळांमधील 118 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
नगर : दर्शक । -
शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळाली, तर तेही उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. त्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक जाणवते, असे प्रतिपादन पद्मशाली सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी यांनी केले.
पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने श्री मार्कंडेय संकुल येथे आयोजित कार्यक्रमात अ.नगर शहरातील विविध शाळांमधील 118 गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणेश लकशेट्टी, इंजि.अक्षय बल्लाळ, अजय लयचेट्टी, श्रीनिवास बुरगुल, रोहित गुंडू, शुभम सुंकी, राजेंद्र बुलबुले, गणेश अवधूत, बालाजी कोक्कुल, वरद लकशेट्टी, बालाजी रायपेल्ली, ओंकार आडेप, अनिकेत दुस्सा, ओंकार जेटला आदी उपस्थित होेते.
संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल म्हणाले की सामाजिक जाणीवेतून प्रेरणा घेऊन गेल्या नऊ वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात आहेत. फक्त मदतपुरवठा करून थांबणे हा आमचा हेतू नाही, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मानसिक आधार देणे हाच आमचा खरा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत श्री मार्कंडेय विद्यालय, वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, 108 महंत सुच्चासिंगजी माध्यमिक विद्यालय, पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय, बालक मंदिर प्राथमिक शाळा, महात्मा फुले विद्यालय, सिताराम सारडा विद्यालय, मनोहरलाल रामचंद्र सबलोक विद्यालय, दादाचौधरी मराठी शाळा अशा विविध शाळांमधील 118 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना इंजि.अक्षय बल्लाळ म्हणाले की, पद्मशाली सोशल फाउंडेशनतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वही व स्वेटर वाटप, तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, साडी व किराणा वाटप,
चित्रकला स्पर्धा, सायकल वाटप, रुग्णांना आर्थिक मदत अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे सदस्य स्वतःहून निधी गोळा करतात.या उपक्रमासाठी प्रशांत कोक्कुल, ओंकार रायपेल्ली आदींचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गुंडू यांनी तर आभार गणेश अवधुत यांनी मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com