बोल फाउंडेशनतर्फे शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
नगर : दर्शक
ब्रेड ऑफ लाईफ (बोल) फाउंडेशन द्वारे भिंगार येतील डॉ बाबासाहेब आंबेडकर व नूतन माध्यमिक शाळा या ठिकाणी ३६ निवृत्त आणि कार्यरत असलेल्या मान्यवर गुरुजनांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आहे.
शिक्षक गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक गुर्जर सर, अहिल्यानगर शहराचे नामांकित चार्टर्ड अकाउंटंट व त्यांच्या पत्नी सौ माधुरी गुर्जर मॅडम आणि नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली नंदकिशोर भंडारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन फाउंडेशनच्या सचिव सौ शोभा पाटोळे यांनी केली, कार्यक्रमाची सुरुवात माननीय श्री अशोक गुर्जर सर, सौ माधुरी गुर्जर, सौ सोनाली नंदकिशोर भंडारे, श्री विनय महाजन सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय शिंदे, माजी मुख्याध्यापक श्री कारभारी मदन आव्हाड व बोल फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली,
यावेळी प्रमुख अतिथी श्री अशोक गुर्जर सरांचा सत्कार बोल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जोसेफ पाटोळे - यांच्यातर्फे करण्यात आला व. प्रमुख पाहुण्या सौ माधुरी गुर्जर आणि सौ सौनाली भंडारे यांचा सत्कार फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी अक्षरा तोरडी व श्रावणी शेलार या विद्यार्थीनीनी शिक्षकांप्रती विद्यार्थीदशेला सकारात्मक विकासाकडे यशाची वाटचाल व जीवन घडवण्याचे कार्य गुरुवर्य करीत असतात म्हणून कृतज्ञता व्यक्त केली उपस्थित गुरुजनांतर्फे शिक्षीका मनिषा साठे, स्नेहल लवंडे , गुलमहंमद शेख आणि मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी गूरुजनांप्रति महत्त्व व्यक्त केले.
भिंगार जेष्ठ नागरिक संघ प्रमुख सुभाष होडगे यांनीही विचार मांडले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक गुर्जर सर शिक्षकांचे , समाजाची- सकारात्मक जडणघडण करण्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे याचे महत्व अनेक उदाहरणांद्वारे व्यक्त करून संदेश दिला.
कार्यक्रमाची सांगता बोल फाउंडेशनचे स्वयंसेवक अनिकेत नितीन पाटोळे यांनी आभार व्यक्त केल्यानंतर झाली शेवटी फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री अंतोन पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com