Ex Servicemen Nagar | मनपा निवडणुकीत माजी सैनिकांना एक जागा मिळावी आ.जगताप यांच्याकडे मागणी

मनपा  निवडणुकीत  माजी सैनिकांना  एक जागा मिळावी  आ.संग्राम जगताप यांच्याकडे मागणी 

मनपा  निवडणुकीत  माजी सैनिकांना  एक जागा मिळावी  आ संग्राम जगताप यांच्याकडे मागणी


       







   नगर- नगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी  आज आमदार संग्राम  जगताप याना  भेटून ,आगामी महानगर पालिका निवडणूक मध्ये माजी  सैनिकांना  एक जागा मिळावी   ही विनंती केली व निवेदन दिले, यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद  दिलायावेळी जयहिंद सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी पालवे,कार्याध्यक्ष शिवाजी गर्जे मेजर,संचालक सचिन दहिफळेमेजर,जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे,प्रहार सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ पालवे मेजर,त्रिदल सैनिक संघ नगरचे अध्यक्ष संजय मस्के मेजर,सचिव मारुती ताकपेरे मेजर,अखिल भारतीय सैनिक संघ संचालक मनसुख वाबळे मेजर,सदाशिव बोलकर व दारकुंडे आदींसह अनेक माजी सैनिक  उपस्थित होते. 





          निवेदनात म्हटले आहे कि  महानगरपालीका निवडणुक 2025-26 मध्ये माजी सैनिकास उमेदवारी देण्याबाबत आपणास  विनंती पत्र देत आहोत  आम्ही नगर जिल्ह्यामध्ये व महाराष्टामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत. महाराष्द्र राज्यामध्ये आजी माजी सैनिकांना राजकीय आरक्षणासाठी मागणी चालु आहे.आता महानगरपालिकेची निवडणुक जवळ आलेली आहे.आमची आपणास विनंती आहे,




आपण नगर महानगरपालीकेमध्ये प्रभाग ३ मध्ये मनसुख  पाटिलराव  वाबळे यांना उमेदवारी द्यावी,माजी सैनिकांच्या हक्कासाठी मनसुख वाबळे हे निस्वार्थ भावनेतुन कार्य करत आहेत.आपण आपल्या मार्गदर्शनाखाली मनसुख वाबळे यांना उमेदवारी द्यावी अशी आपणास नगर जिल्हयातील व शहरातील सर्व आजी माजी सैनिक,शहिद परिवार,सैनिक परिवार यांच्या वतीने विनंती आहे.




           आपण देशभक्त आमदार आहात आपण नक्कीच सैनिक परिवाराच्या विनंतीला मान देऊन नगर महानगरपालीकेमध्ये पहिल्यांदा माजी सैनिक नगरसेवक करण्यासाठी आम्हाला न्याय मिळवुन द्याल अशी आपणास विनंती आहे. 




         माजी सैनिक समाजात अनेक संघटना कार्य करतातज्या माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी काम करतात. या कामांमध्ये शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेसारख्या संस्थांच्या माध्यमातून नोकरी व पुनर्वसनविषयक प्रश्न सोडवणेतसेच माजी सैनिकांच्या हक्कांसाठी आवाज उचलणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्तकाही संस्था माजी सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणात आणि सामाजिक सुरक्षेमध्येही मदत करतात. तसेच नगरसेवक जा माजी सैनिक झाला तर मनपा मधील समस्या सुद्धा सोडवण्यास मदत होईल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या