पोलिस भरतीमध्ये फसवणूक ७ निर्दोष
नगर- दि. १३/०५/२०१३ रोजी सकाळी ६.०० ते ०२/०६/२०१३ रोजीचे सकाळी ११.०० दरम्यान नगर शहरातील पोलिस मुख्यालयाचे कवायत मैदान येथे आरोपी अर्जुन सिताराम घुमावत व इतर ६ आरोपी सर्व रा. जालना यांनी पोलिस भरती प्रक्रियेत आपल्या ऐवजी मैदानी पात्रतेसाठी बोगस व्यक्ती पाठविल्या व मैदानी चाचण्या दिल्या
तर लेखी परिक्षेकरीता स्वतः ऐवजी दुस-या व्यक्तींना स्वतः लेखी परिक्षा दिल्याचे भासविले म्हणून मुळ उमेद्वार तसेच मैदानी चाचण्यांसाठीचे व लेखी परिक्षा देणारे असे एकंदर ७ जणांनी पोलिस खात्याची फसवणूक केली
म्हणून येथील तोफखाना पोलिस स्टेशन येथे सर्वांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर मुळ उमेदवारांची निवड झाल्यानंतर हा प्रकार बिना नावाचे पत्राने उघड झाल्यानंतर तपासाअंती सदर गुन्हा दाखल झाला असता, त्याची सुनवणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, यांचे समोर होऊन वरील सर्व ७ हि आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांचे तर्फे अॅड. सतिशचंद्र सुद्रीक यांनी काम पाहिले.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com