मा.खा.डॉ.सुजय विखे यांच्या वाढदिवसा निमित्त बालघर मध्ये विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना ब्लॅंकेट वाटप
नगर : दर्शक ।
नगर- माजी खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचा ध्यास घेत विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सेवा कार्य राबविण्यात आले.
थंडीचा कडाका वाढत असताना सावेडी उपनगरातील बालघर प्रकल्प तपोवन रोड येथे राहणाऱ्या निराधार सर्व विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करून उबदार भेट देण्यात आली.
या उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले विघ्नहर्ता प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष योगेशभाऊ सोनवणे पाटील यांनी सांगितले की,नेहमी प्रमाणे याही वर्षी आम्ही वाढदिवसाचे औचित्य साधत कोणताही अनावश्यक खर्च न करता
समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले.गरीब, अनाथ व निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच खरी सुजयदादांना वाढदिवसाची भेट आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com