Shrirampur Halla Nivedan | काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर हल्ल्याचा निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन
Shrirampur Halla Nivedan | नगर : दर्शक ।
नगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध करतो. मतभेद असले तरी त्यांना हिंसेचा मार्ग निवडून व्यक्त करणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आणि सामाजिक सौहार्द बिघडवणारे कृत्य आहे.त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीना त्वरित अटक करा अशी मागणी चे निवेदन
आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले,यावेळी नगर तालुकाध्यक्ष अरुण मस्के, दीप चव्हाण,रिजवान शेख,भरत बोडके,फिरोज भाई शेख,महेंद्र शेळके,पापामिया पटेल,गणेश तोडमल,फय्याज शेख,अभिजीत कांबळे, अभिनय गायकवाड,मोहसीन शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे सचिन गुजर हे समाजकारण, काँग्रेस संघटन बळकटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेते आहेत.अशा नेत्यावर हात उगारणे म्हणजे लोकशाहीविरोधी प्रवृत्तींचा पराकाष्ठा आहे.त्यासाठी आमच्या मागण्या आहेत.
कि हल्लेखोर समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,जिल्हा प्रशासनाने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी,जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी.
सचिन गुजर यांना आम्ही पूर्ण सहानुभूती व्यक्त करतो व त्यांच्या मानसिक व शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा देतो.हिंसेला लोकशाहीत जागा नाही- समाजातील अशांतता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा सर्वांनी मिळून निषेध करतो असेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो-अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीना त्वरित अटक करा या मागणी चे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले यावेळी नगर तालुकाध्यक्ष अरुण मस्के, रिजवान शेख,भरत बोडके,फिरोज भाई शेख,महेंद्र शेळके, पापामिया पटेल, गणेश तोडमल,फय्याज शेख,अभिजीत कांबळे, अभिनय गायकवाड, मोहसीन शेख आदीं

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com