Election Holiday Nagar | मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
अहिल्यानगर, दि.२७ :-
नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी
दि.१ डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.१ डिसेंबर रोजी व दि.२ डिसेंबर २०२५ 'मतदानाच्या' दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com