District Court Nagar | जिल्हा व सत्र न्यायालयातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 District Court Nagar | जिल्हा व सत्र न्यायालयातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकूण ५५ रक्तदात्यांचे रक्तदान

District Court Nagar | जिल्हा व सत्र न्यायालयातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर : दर्शक । 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन, सर्व न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.


जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रक्तदान हे सर्वोत्तम दान असल्याचे सांगत समाजातील गरजू रुग्णांसाठी अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश (१) ए. एम. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, मुख्य न्यायदंडाधिकारी एल. एस. पढेण, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश कातोरे, सतीश पाटील तसेच जिल्हा सरकारी वकील, न्यायिक अधिकारी आणि दोन्ही वकील संघांचे विधिज्ञ उपस्थित होते.


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या