ट्रस्टींना नोटीसा, तक्रारदार काळेंचाही होणार जबाब
नगर : दर्शक ।
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंड प्रकरणा बाबत ठाकरे शिवसेना
महानगर प्रमुख किरण काळे यांच्या तक्रारी नंतर प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली आहे. यामुळे ट्रस्टींचे धाबे चांगलेच
दणाणले आहेत. उपधर्मदाय आयुक्त, अहिल्यानगर यांनी यासाठी चौकशी निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
ट्रस्टचे सगळे दस्तऐवज, पुरावे घेऊन हजर होण्याची नोटीस सर्व ट्रस्टींना बजावण्यात आली आहे.
तक्रारदार काळे यांना देखील त्यांचे म्हणणे पुराव्यांसह सादर करण्याकरिता पाचारण करण्यात आले आहे.
कष्टाने कमावलेल्या नगरकरांच्या भूखंडावरील ताबा डेंगूच्या ताबेमारीचा नायनाट करण्यासाठी तीव्र लढा
उभारणार असल्याचे काळेंनी म्हटले आहे.
सदर प्रकरण हे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाले आहे. किरण काळे यांनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर
आता पर्यंत या प्रकरणात खा. सुप्रिया सुळे, खा. निलेश लंके, माजी आ. रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री,
धर्मदाय कार्यालय, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती.
आता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ३७ अन्वये ही सखोल चौकशी सुरू
करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात कायदेशीर युक्तिवाद रंगणार आहे. तक्रारदार काळे यांनी मंदिर ट्रस्ट भूखंडावर ताबेमारी
झाली असून भूखंड तात्काळ मयत मातेच्या मृत्युपत्रा प्रमाणे धर्म कार्यासाठी ट्रस्टच्या ताब्यात देण्या करिता ट्रस्टी
आणि ताबे बहादरांवर कारवाई करावी, विश्वस्त असून देखील मयत देणगीदारशी विश्वासघात करून धर्मदाय
कार्यालयाला अंधारात ठेवत परस्पर विक्रीचा घाट घातल्याबद्दल कारवाई करावी, भूखंड विक्रीच्या प्रक्रियेला
स्थगिती द्यावी, दोषी ट्रस्टींवर कायदेशीर कारवाई करावी, गैरकारभार करणाऱ्या सर्वच ट्रस्टींना पदावरून हटवून
प्रशासकाची नेमणूक करावी यासह अन्य मागण्या पुणे येथे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर धरणे
आंदोलन करून काळे यांनी केल्या होती.
त्यातच किरण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील मुंबई येथे भेट घेत तक्रार केली आहे.
पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे काळे यांनी म्हटले आहे. भ्रष्ट ट्रस्टी यांनी अर्थपूर्ण
लाभासाठी प्रचंड अनागोंदी, गैरकारभार केला आहे. त्यांची जागा तुरुंगात आहे. धर्माशी प्रतारणा करत पाप
करणाऱ्यांना परमेश्वर देखील माफ करणार नाही, असे काळे यांनी म्हटले आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करा :
ट्रस्ट अध्यक्ष, अन्य ट्रस्टी, ट्रस्टने नेमलेले सहकार ट्रस्टी या सर्वांनी संगनमत करून भूखंड गैरव्यवहार केला आहे.
कारभारत मोठ्या प्रमाणावर अफरातफर झालेली आहे. प्रत्येक ट्रस्टीची स्वतंत्र सखोल चौकशी धर्मदाय कार्यालयाने
करावी. ट्रस्टवर तात्काळ प्रशासक नेमून गैरव्यवहारांना आळा घालावा. दोशी ट्रस्टींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे,
अशी भूमिका चौकशी प्रक्रियेत घेणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com