Nagar Crime | रिक्षाचालकावर जीव घेणा हल्ला ; माळीवाड्यातील घटनेने शहरात खळबळ

 Nagar Crime | रिक्षाचालकावर जीव घेणा हल्ला ; माळीवाड्यातील घटनेने शहरात खळबळ

Nagar Crime | रिक्षाचालकावर जीव घेणा हल्ला ; माळीवाड्यातील घटनेने शहरात खळबळ


Nagar Crime | नगर | दर्शक 

येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी एका रिक्षाचालकावर शिवीगाळ करत लोखंडी अँगलने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपीं विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दिलेल्या माहितीनुसार, सिराज इब्राहिम सय्यद (वय २०, रा. शहा कॉलनी, भिंगार) हे रिक्षाचालक दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बस स्थानकाजवळील पार्सल गेटसमोर प्रवाशांना उतरवत होते.


त्याच वेळी आरोपी वसंत रंगनाथ मोकाटे (रा. जाधव मळा, बुरुडगाव रोड) आणि नवनाथ विष्णु सातपुते (रा. सावेडी नाका) हे दोघे तेथे आले. तू येथे का आलास, तू येथे गाडी थांबवायची नाही असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.



या दोघांनी रिक्षाचालक सिराज सय्यद यांना रिक्षातून बाहेर काढले. त्यानंतर हाताच्या चापटीने, बुक्क्यांनी आणि लाथांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक दोन, नवनाथ सातपुते, याने जवळ असलेला लोखंडी अँगल घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. 



या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी रिक्षाचालक सिराज सय्यद यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या