New Arts College Nagar | न्यू आर्टस् कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रोप्यपदक

 New Arts College Nagar |  न्यू आर्टस् कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रोप्यपदक

न्यू आर्टस् कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रोप्यपदक


नगर : दर्शक । 

न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून रोप्यपदकाचा मान मिळवला आहे. 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या विभागात या संघाने नाशिक विभाग व छत्रपती संभाजीनगर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत दमदार प्रवेश मिळवला. फायनलमध्ये अमरावती विभागाबरोबर झालेला सामना अतिशय चुरशीचा झाला. अखेरीस उत्तम खेळ करूनही न्यू आर्टस् कनिष्ठ महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावत रोप्यपदक जिंकले.




           न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय 
                           कामगिरी करून रोप्यपदकाचा मान मिळवला आहे. (छाया: सागर इंगळे)


      या स्पर्धेत सागर एडके, शिवम गोरडे आणि सुमित देसाई या तिघांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाशिम येथे 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.




      संघामध्ये कर्णधार यश साळवे यांच्यासह सागर एडके, सार्थक शिंदे, शिवम गोरडे, साद कागदी, सुमित देसाई, महेंद्र परदेशी, कृष्णा काळे, गणेश ब्राह्मणे, शिवप्रताप शिंदे, यश कर्डिले आणि रोहित गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता.




       या विजयानंतर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश दादा मुळे, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, सर्व विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, संचालक डॉ. भास्कराव झावरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, प्रबंधक बबन साबळे आणि सर्व उपप्राचार्य यांनी संघाचे अभिनंदन केले.




     प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी या खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून स्पर्धा देखील तीव्र झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर न्यू आर्टस् कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेपासून सर्व सामने 15 ते 20 गुणांच्या फरकाने जिंकत राज्यस्तरापर्यंत वाटचाल केली. स्पर्धा विजेत्या व उपविजेत्यांना प्रमाणपत्र आणि भव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.



      सागर एडके याला स्पर्धेतील ‘बेस्ट रेडर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या संघाला क्रिडा शिक्षक प्रा. सुधाकर सुंबे व प्रा. आकाश नढे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या