Savedi | गोंदवले दिंडीचे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने उत्साहात स्वागत
नगर : दर्शक ।
सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सेवाभावी मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही नगर-गोंदवले दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले. दिंडीचे प्रस्थान रविवारी सकाळी भक्तीमय वातावरणात झाले. पहाटे श्रींच्या पादुकांवर अभिषेक केल्यानंतर त्या पालखीत स्थापित करण्यात आल्या. पादुकांची पूजा माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते संपन्न झाली.
शिलाविहार येथुन प्रस्थान झाल्यानंतर वारकर्यांच्या सेवेसाठी विविध समाजसेवेच्या पुढाकारांचा समावेश होता. कोठला चौकात खांडरे परिवाराच्या वतीने सर्व वारकर्यांना चहा-बिस्कीटे वाटप करण्यात आले. पुढे कायनेटिक चौकात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वारकर्यांचे सत्कारपूर्वक स्वागत करून त्यांना आर्थिक योगदान देत सहकार्य केले.या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा दृढ झाली.
या प्रसंगी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष संजय गोरे, प्रमोद पंतम,शरद बेरड, सुभाष काकडे, प्रमोद पाठक, राहुल लिमये प्रसिद्ध प्रमुख विजय मते आदी पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. तसेच सुभाष लुणीया परिवाराच्या वतीने सर्व वारकर्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
दिंडी चालक सौ.रेखाताई रिंगणे यांनी सांगितले की, यंदा दिंडीला 25 वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी नगर शहर व उपनगरातील वृत्तपत्र विक्रेते मोठ्या मनाने दिंडीसाठी योगदान देतात. त्यांच्या सहकार्यामुळे दिंडीची सेवा अधिक भक्कम होते.
दिंडीचे प्रस्थान झाल्यावर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिंडीसोबत पायी चालत सर्व वारकर्यांना निरोप दिला. वारकरी, विक्रेते व नागरिकांच्या उपस्थितीमुळे दिंडीचा मार्ग भक्तिमय निनादांनी व अभंगगायनाने भरून गेला.श्रद्धा, सेवा आणि समर्पणाने सजलेली ही दिंडी पुढील मार्गाला रवाना झाली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com