Shrirampur News | स्वाती कोळेकर यांना पीएच.डी. प्रदान
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
स्वाती सुरेश कोळेकर यांना इंग्रजी विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. संशोधन केंद्र हे संगमनेर येथील, डी जे मालपाणी वाणिज्य आणि बी.एन. सारडा विज्ञान महाविद्यालय आहे.
१९५० नंतरच्या भारतीय उपखंडातील निवडक इंग्रजी महिला कादंबरीतील स्त्रीवाद: तुलनात्मक अभ्यास या विषयावर प्रा. डॉ. डी. एम. घोडके सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड सर तसेच बोरावके महाविद्यालयामधील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील देवकर सर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
त्या सर्टिफाईड ऑडिटर श्री. सुरेश कोळेकर यांच्या कन्या तसेच श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. रमेश कोळेकर यांच्या त्या पुतणी आहेत.
वृत्त विशेष सहयोग हानिफभाई पठाण (भा.ल.से.) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोगसमता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com