Nivedan | मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची मागणी – अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर – मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे संघर्षयोध्दा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवावर घात करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज, अहिल्यानगर तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मनोज दादा जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण उघडकीस आले असून जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचे गंभीर आरोप होत असून, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात यावे, अशी मागणी अखंड मराठा समाजाने केली आहे.
याचबरोबर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबतही निवेदनात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून जनतेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना मिलिंद जपे, परमेश्वर पाटील, अभय शेंडगे, वैभव भोगाडे, नगरसेवक मदन आढाव, दिलीप कोल्हे, गणेश नाईकनवरे, प्रमोद कोरडे, रत्नाकर दरेकर, अशोक पवार, श्रीपाद दगडे, गुंजाळ साहेब, रमेश मुंगसे, भारत भोसले, एडवोकेट अनुराधा येवले, कांताताई बोठे आणि मीनाक्षीताई वागस्कर आदींची उपस्थिती होती.
मराठा समाजातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप असून, या कटात सामील असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांचीही मागणी होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com