लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सप्ताह संपन्न

अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी संतांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी -आ संग्राम जगताप





नगर : दर्शक । 

 भारतीय संस्कृतीमध्ये तत्कालीन परिस्थितीत अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत समाजामध्ये जागरूकता आणण्याचे काम संतांनी केले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारत महासत्तेकडे जात असताना आपली भारतीय संस्कृती ,परंपरा ,संतांचे विचार पुढच्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणे ही आजच्या काळाची गरज आहे. 



महान विठ्ठल भक्तीचे पाईक असणारे संत शिरोमणी नरहरी महाराज आणि त्यांची शिकवण आज या सप्ताहाच्या निमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत जात आहे .संत विचारांची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी असे कार्यक्रम प्रेरक असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केले.




     श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 740 व्या पुण्यतिथीनिमित्त लाड सुवर्णकार समाज विश्‍वस्त संस्था व युवक मंडळाच्या वतीने कोर्ट गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित सप्ताहाच्या समारोपसंगी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी ह भ प जनार्दन महाराज माळवदे यांचे काल्याचे किर्तन झाले. या कार्यक्रमास मा. उपनगराध्यक्ष किशोर भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, पै.मनोज सुभाष लोंढे, संतोष ग्यानप्पा ,नगरसेवक गणेश कवडे ,सौ आशा किशोर डागवाले समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





      या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांचा ह भ प माळवदे महाराज यांनी सत्कार केला. नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या सन्मान संजय देवलालीकर यांनी केला. नगरसेविका सौ.आशा डागवले यांचा सन्मान सौ कांचन निफाडकर यांनी केला .यावेळी सप्ताह निमित्त आयोजित महाप्रसादासाठी रामु विनायक नांदुरकर तसेच महिला भजनी मंडळ समन्वयक सौ सुनीता कुलट व शहरकर परिवार यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. 




गेली सात दिवस चाललेल्या या पुण्यतिथी सोहळ्यासाठी लाड सुवर्णकार विश्‍वस्त मंडळ, युवक संघटना, समाज बांधव तसेच विश्‍वस्त मंडळाचे सदस्य संजय देवळाली कर ,मुकुंद निफाडकर ,शरद कुलथे, सचिन देवळालीकर ,प्रकाश देवळालीकर ,जगदीश देडगावकर, श्याम मुंडलिक, विनोद कुलथे, योगेश नागरे ,गणेश डहाळे, सुरेश मैड आदींचे सहकार्य लाभले.