Roza Ramzan | चिमुकल्यांचा पवित्र रमजान रोजा – हन्नान व मन्नानचे सर्वत्र कौतुक
Roza Ramzan | नगर : पवित्र रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवण्याला इस्लाम धर्मात विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही धार्मिक संस्कार दिसून येत आहेत. पत्रकार सरवर तांबटकर यांच्या दोन नातवांनी यंदा रमजानचा रोजा ठेवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मन्नान ओवेस शेख (वय 4) या चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा ठेवला. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ज्युनिअर के.जी. मध्ये शिक्षण घेत आहे. अवघ्या चार वर्षांच्या वयात कडक उन्हातही त्याने रोजा पाळल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मन्नान हा अभ्यासात अत्यंत हुशार असून, पुस्तकातील धडे त्याला सहज तोंडपाठ असतात. लहान वयातच त्याच्यात दिसणारे धार्मिक संस्कार आणि जिद्द पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत.
तसेच हन्नान ओवेस शेख (वय 6) यानेही रमजानचा पहिला रोजा ठेवत आदर्श निर्माण केला आहे. हन्नान हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच खेळामध्येही तो नेहमी पुढे असतो. लहान वयात रोजा पाळल्यामुळे त्याचे समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
या दोन्ही चिमुकल्यांनी रमजानचा रोजा ठेवत धार्मिक परंपरा जपण्याचा सुंदर संदेश दिला असून, त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com