Satkar | अहिल्यानगर मनपा वॉर्ड १६ च्या नगरसेविका वर्षा काकडे यांचा गौरव
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १६ मधून नगरसेवकपदी निवडून आलेल्या वर्षा सुजित काकडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या तर्फे त्यांचे सासरे उद्योजक बाबुराव काकडे यांनी हा सत्कार स्वीकारला वर्षा काकडे यांच्या विजयानंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
या प्रसंगी एन.आर. कन्स्ट्रक्शनचे संचालक तसेच माजी उपमहापौर हाजी नजीर यांच्या हस्ते वर्षा सुजित काकडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दरबार कन्स्ट्रक्शनचे हाजी वाजीद जहागिरदार हेही उपस्थित होते. उपस्थितांनी वर्षा काकडे यांना शुभेच्छा देत आगामी काळात वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना हाजी नजीर म्हणाले की वर्षा काकडे यांनी नागरिकांचा विश्वास संपादन करत ही निवडणूक जिंकली असून त्या निश्चितच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील. वॉर्डातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते व इतर विकासकामांसाठी त्या प्राधान्याने काम करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com