Top News

Savedi | वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रात्यक्षिकासह विज्ञान दिन समर्थ प्रशालेत उत्साहात साजरा

 Savedi | वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रात्यक्षिकासह विज्ञान दिन समर्थ प्रशालेत उत्साहात साजरा

Savedi | वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रात्यक्षिकासह विज्ञान दिन समर्थ प्रशालेत उत्साहात साजरा



      




 Savedi | नगर : दर्शक । 

श्री समर्थ विद्यामंदिर सावेडी, माध्यमिक विभागात विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री समर्थ पूजन करून झाली. त्यानंतर इयत्ता आठवीतील  मुलं व मुली यांनी रेखाटलेल्या सुबक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवर सौ क्रांती मुंदाणकर  यांच्या हस्ते झाले. 



प्रशालेचे पर्यवेक्षक श्री एल एम कुलकर्णी सरांनी विज्ञान दिनाचे महत्त्व प्रास्ताविकेतून विषद केले. अतिथी परिचय विद्यार्थीनी गौरी दळवीने केला. प्रमुख अतिथींनी विज्ञानाचे प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे सादर केले. त्यानंतर मान्यवर अतिथींचे व विज्ञान अध्यापकांचे सत्कार संपन्न झाले. प्रशालेतील कुमारी अवंती चव्हाण, स्वरा वामन, रेणुका कुलकर्णी या विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाची माहिती सांगितली.  



        अतिथींनी आपल्या मनोगततून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त वैज्ञानिक दडलेला असतो असे भाष्य व्यक्त केले तसेच छोट्या गोष्टीतून मोठ्या संशोधनाची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शालेय समिती चेअरमन  देशपांडे सरांनी विज्ञानदिना विषयी विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हटले, वैज्ञानिक प्रगतीत भारताचे नाव जागतिक स्तरावर घेतले जाते, गरज ही शोधाची जननी असुन विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी जवळीकता साधून आपल्या कल्पकतेने पालकांचे व शाळेचे नाव उंच करावे. 




        विविध विज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये बक्षीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. 




        या कार्यक्रमास प्रमुख अतिथी सिताराम सारडा विद्यालयाच्या शिक्षिका सौ. क्रांती मुंदाणकर, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन माननीय ॲड. किशोरजी देशपांडे सर प्रशालेच्या प्राचार्य वसुधा जोशी, पर्यवेक्षक  श्री एल एम कुलकर्णी,  व विज्ञानाचे  सर्व अध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राजनंदिनी लंके हिने तर आभार कुमारी तनुश्री आढाव हिने मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने