महात्मा फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहमदनगरमधील वास्तुंच्या ठिकाणीच महापालिकेने चित्रप्रसंग लावावेत - भैरवनाथ वाकळे

मखदुम सोसायटी तर्फे महात्मा फुले यांना अभिवादन





नगर - भारतातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाची कामगिरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले दाम्पत्य यांनी वेळोवेळी अहमदनगर शहरात भेट दिली, वास्तव्य केले. त्यात अहमदनगर मराठी मिशनच्या सिंधिया फेरार यांच्या क्लेरा ब्रुस कन्याशाळेत सावित्रीमाई फुले व फातिमा शेख या काही दिवस शिक्षिकेचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. तर काही न्यायालयीन कामकाजासाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल येथिल असलेले मेन हॉल कोर्टास भेट दिली होती. येथे त्यांचे मित्र सदाशिव विनायक गोवंडे कार्यरत होते.


महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले दांपत्याची प्रासंगिक भितीचित्रे महापालीकेने तयार करून या दोन ठिकाणी लावावी. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला फुले दाम्पत्याचे शैक्षणिक योगदान स्मरणात राहील. अशी मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे कार्याध्यक्ष भैरवनाथ तुकाराम वाकळे यांनी केली.


महात्मा ज्योतिबा फले जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळातर्फे महात्मा फुले यांच्या माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, शब्बीर शेख, इंजि.अभिजित वाघ, संध्याताई मेढे, दत्ताभाऊ वडवणीकर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, सय्यद शफकत, पंकज गुंदेचा, फिरोज शेख, संतोष गायकवाड, डॉ.नन्नवरे,एड.विधाताई,दिपक क्षीरसागर,तुषार सोनवणे, राजेंद्र कर्डिले, रविंद्र सातपुते आदी उपस्थित होते.