भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते - किरण काळे 

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते - किरण काळे









नगर : दर्शक । 
आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी देशाला अस्थिर करण्याचे डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर, एकसंध ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते, असे प्रतिपादन अहिल्यानगर शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. डॉ.आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 





डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केल्यानंतर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी काळे यांच्यासह संजय झिंजे, मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, रावजी नांगरे, दीपक भोसले, राम वाणी, राम झिने, अलतमश जरीवाला, रोहन शेलार, चंद्रकांत उजागरे, संतोष घरवाढवे, मतीन शेख, उषाताई भगत, शैलाताई लांडे, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, अमोल खाडे, रामभाऊ धोत्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 




किरण काळे पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश समाजाला दिला. शिक्षणाच्या बाबतीत आपण पुढे आलो आहोत. मात्र आज देशामध्ये ज्या पद्धतीने देश तोडण्याच्या कृती सुरू आहेत या कृतींच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. 




काही लोकांना देशाच संविधान नको आहे. त्यांना मनुस्मृति पुन्हा आणायची आहे. हे षडयंत्र रोखण्याचे काम आपल्याला संघटितपणे करावे लागेल. संविधानाचा जागर करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. शांततेचा विचार घेऊन समाज विघातक प्रवृत्तींपासून समाजाला वाचण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी काळे यांनी केले.