जय मल्हार विद्यालयात शिक्षणाची डिजिटल प्रणाली येणार! 










          नगर-पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम गणपत सुंबरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ 26 एप्रिलला विद्यालयात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव ऍड.पांडुरंग गायकवाड यांनी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये जय मल्हार विद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांनामुलींना डिजिटल शिक्षण देण्याचा संकल्प जाहीर केला.






         या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्री दिलीपराव थोरे माजी शिक्षणाधिकारी अहिल्यानगरज्ञानदाता शिक्षण संस्था ठाणेचे अध्यक्ष  श्री सुनील फापाळे  यांनी तडफदार भाषणाने श्रोत्यांना प्रोत्साहित केले.सुंबरे सर यांच्या बद्दल त्यांनी आठवणी काढून भावनिक वातावरण तयार केले.मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष  सुनील पंडित हे उपस्थित होते. तालुक्यातील प्रमुख प्राचार्यमुख्याध्यापक,शिक्षक,पाहुणेनातेवाईक,ग्रामस्थ,पालक याप्रसंगी उपस्थित होते . 







             अध्यक्षीय भाषणात ड. गायकवाड पुढे म्हणाले कीशहरी भागातील मुलांची स्पर्धा करण्या करता ग्रामीण,गोरगरीब मुलांना डिजिटल शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी विद्यालयांमध्ये नवीन इमारत पूर्ण होत असून शाळेत यापुढे डिजिटल शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सुंबरे सरांनी पुढील काळात शिक्षण तज्ञ म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.




        प्रमुख पाहुणे  थोरे  यांनी आपल्या भाषणांमधून .विद्यालयाबाबतच्या काही आठवणी यावेळी सांगितल्या.मुख्याध्यापक सुंबरे सर यांच्या बद्दल बोलताना त्यांनी आठवणी व सकारात्मक कार्यशैली बाबत आपल्या कार्यकाळातील आठवणीना उजाळा दिला . शाळेची होत असलेली प्रगती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष  सुनील पंडितमुख्याध्यापक सर्वश्री रामराव पवार ,अशोक ठुबे बाबासाहेब दाते सर,संगमनेर येथील संजय वाळे सरमाजी विद्यार्थी राजाराम मुंडेपोपट सुंबरेग्रामस्थ जालिंदर खोसेबाबाजी जगतापलक्ष्मण सुंबरे यांनीही सुंबरे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भाषणात दिल्या. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भाषणांमधून सुंबरे सरांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.






        या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्यातून मुख्याध्यापक सुदाम दळवी मुख्याध्यापक राजेंद्र वाघ ,प्राचार्य संदीप मस्के मुख्याध्यापक सर्वश्री संतोष ठाणगे वाळुंज सर, , रसाळ सर, , देंडगे सर, , सपकाळ सर व आबासाहेब गायकवाड सरकानूर पठार येथील जनता विद्या मंदिर चे प्राचार्य  काळे सरनानाभाऊ भांबरेबबन चिमाजी पुंडेजनार्धन महाराज मुंडे,माजी उपसरपंच दादाभाऊ पुंडे,तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले,धोंडीभाऊ शेठ जगतापगोरख जगतापशंकर गायकवाड,किसन मुंडे,शांताराम खोसेखंडू सुपेकरदादाभाऊ नरवडेबाबाजी जगतापभाकरे सर,रेवण सुंबरेराजाराम सुंबरेअशोक सुंबरेसंतोष सुंबरे उपस्थित होते.






   यावेळी संस्थेचे सचिव गायकवाड  यांनी सुंबरे सरांचा संपत्त्नीक सत्कार केला. विद्यालयाकडून सर्व शिक्षक कर्मचारी स्टाफ यांच्या वतीनेही सरांचा योग्य सन्मान केला गेला. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनीही सुंबरे सर यांचा कार्याबद्दल सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सेवापूर्ती गौरव समारंभाला उत्तर देताना  उत्तम सुंबरे यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या काबाडकष्टाच्या आठवणी सांगताना गहिवरून आले होते.





       तसेच याप्रसंगी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर प्राचार्यमुख्याध्यापक,शिक्षकपाहुणेपालक,नातेवाईक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयातील शिक्षक उंडे सर यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तिला भगवंत भांबरे यांनी त्याला अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गर्कळ सर यांनी केले व आभार  केदारी सर यांनी मानले.कार्यक्रम नंतर सर्वांना भोजनाचा लाभ देण्यात आला.