Nepti News | नेप्तीत बकरी ईद निमित्त हिंदू- मुस्लिम एक्याचे दर्शन, मुस्लिम बांधवाकडून शांततेसाठी प्रार्थना
Nepti News | नगर : दर्शक ।
नगर तालुक्यातील नेप्ती येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद ज्याला ईद -उल - अजहा असे म्हटले जाते. बकरी ईद मोठ्या उत्साहात बंधूभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .भल्या सकाळीच मुस्लिम बांधव गावातील मशिदीमध्ये आल्यानंतर मौलाना मुनीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण पार पडले.त्यानंतर हिंदू -मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते .
सकाळपासूनच मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज पठण केले अशी माहिती रामदास फुले यांनी दिली. यावेळी देशात शांतता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून एकमेकांना शुभेच्छा देत बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच फारुख सय्यद, सरपंच संजय अशोक जपकर, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, उत्तम फुले, मौलाना मुनीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य दादु चौगुले,
प्रा. बाबुलाल सय्यद, हुसेन सय्यद, गुलाब सय्यद, अजर सय्यद, बबन सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, मेहबूब सय्यद, सादिक सय्यद, वाजीद सय्यद, मुक्तार सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, सलीम सय्यद, युनूस सय्यद, हन्सार सय्यद, कयूम सय्यद, उमर सय्यद, नावेद सय्यद, रमिज सय्यद, आदिल सय्यद, परवेज सय्यद, बादशाह सय्यद, रफिक सय्यद, वासिम सय्यद, मोईन सय्यद, आसिफ सय्यद, आसिफ शेख, एजाज सय्यद, सबाजी कांडेकर, प्राध्यापक एकनाथ होले, मच्छिंद्र होळकर, गुलाब राऊत, भाऊ होळकर, गोपीनाथ होळकर, सुरेश कदम ,रावसाहेब पुंड नसीर सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणानिमित्त गावात सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेहाचे दर्शन घडले.
. बकरी ईद हा सण हजरत इब्राहिम यांच्या त्यागाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. समाजात प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढवण्याचे मोठे कार्य या सणातून घडते.” त्यांनी सर्वांनी एकमेकांच्या भावना समजून घेत सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले. बकरी ईद हा सण बलिदान त्याग व मानवतेच्या संदेश देणारा सण आहे असे प्रतिपादन माजी उपसरपंच फारुक सय्यद यांनी केले.
पुढे बोलताना सय्यद म्हणाले की, “धार्मिक सण हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम असतात. नेप्ती गावात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने आणि शांततेत सण साजरे करतात, ही गावाची परंपरा अभिमानास्पद आहे. आजच्या काळात सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मान टिकवणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.” त्यांनी युवकांनीही सामाजिक ऐक्य मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
बकरी ईद निमित्त गावातील विविध भागांत भेटीगाठी, शुभेच्छांचा वर्षाव आणि सामुदायिक ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. युवकांनीही सणाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सणानिमित्त विविध व्यवस्था सांभाळत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण गावात शांतता, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com