Sitaram Sarda School | सीताराम सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निसर्गसंवर्धन उपक्रम; टाकाऊ वस्तूंमधून पक्षांसाठी शंभराहून अधिक घरटी तयार
Sitaram Sarda School | नगर : दर्शक । १ मे २०२६ ।
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली.
सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूपच बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो अतिशय जवळचा आहे. शहरात वृक्षांची कमतरता असल्यामुळे पक्षांसाठी सध्याच्या वातावरणात आपल्या गच्चीवर, अंगणात पाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या राहण्यासाठी घरटी तयार करणे आज आवश्यक आहे. याचा विचार करून सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ वस्तूंपासून कलात्मकरीत्या पक्षांसाठी घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना कला शिक्षक तथा मुख्याध्यापक अशोक डोळसे यांनी ही घरटी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत शंभराहून अधिक सुंदर घरटी तयार केली. या घरट्यांमध्ये पक्षी सहज बसू शकेल, त्यासोबत पाण्याची व्यवस्था, खाण्यासाठी दाणे ठेवण्याची व्यवस्था देखील विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मकतेने केलेली आहे.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा यांनी पारितोषिके दिली. अशाच उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांची निसर्गाप्रती असलेली कर्तव्याची भावना जागृत होते असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आपल्या कलेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन करता येते. हा संदेश या उपक्रमातून देण्याचा हेतू असल्याचे कलाशिक्षक गणेश नागपुरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. पर्यवेक्षिका सौ. नंदा कानिटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्वहस्ते त्यांना पारितोषिके दिली.
छंद वर्गाच्या माध्यमातून काही निसर्ग उपयुक्त कलात्मक करता येते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या घरट्यांसोबत आपला सेल्फी काढून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमात विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या पालकांनी देखील उत्तम सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी दीपक आरडे, चंद्रशेखर वाघ, अजय पुंड, अनंत जोशी, सौ शितल शिंदे, सौ निमा राहींज, सौ वृषाली जोशी, श्रीमती क्रांती मुंदानकर रवींद्र चोभे यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com