काळभैरवनाथ दिंडीचे पंढरपूरला  प्रस्थान


काळभैरवनाथ दिंडीचे पंढरपूरला  प्रस्थान




               नगर-  ब्रहम्कालिन तात्या महाराज यांच्या आशिर्वादाने तसेच समस्त ग्रामस्थ देऊळगाव गलांडे यांच्या सहकार्याने व तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र देऊळगाव गलांडे,ता.श्रीगोंदा ते पंढरपुर पायी दिंडी सोहळाचेप्रस्थान  झाले दिंडीचे हे ५ वे  वर्ष आहे यामध्ये  पंचक्रोषीतील असंख्य भाविक  सहभागी झाले 




            दिंडीमध्ये तात्या काटकर महाराज,केशव महाराज बावर,दत्तात्रय महाराज गव्हाणे,अश्विनीताई महाराज रणसिंग,अक्षय महाराज पवार,  दत्तात्रय महाराज गव्हाणे आदी सहभागी आहेत.दिनांक २६ जुलै रोजी  अश्विनीताई रणसिंग महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर  रामराव महाराज  गलांडे यांचा काल्याचा महाप्रसाद होईल व दिंडीची सांगता होईल 

                दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम गडदे बिरू  विटभट्टी,मोठा विठ्ठल शेजारी,पंढरपुर येथे राहणार आहे.