प्राध्यापिका दिपांजली चंद्रशेखर भालेराव यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात
नगर : दर्शक । नगर -सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती दिपांजली चंद्रशेखर भालेराव यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अध्यापन विद्यार्थी घडविणे तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दिलेल्या योगदाना बद्दल त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रेव्ह.अने व्ह.अनोश शिरसाठ पाळक यांच्या प्रार्थनेने झाली.सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयातील अध्यापिकांनी ईशस्तवन, तर विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रिबेका चांदेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.शिंदे सर यांनी करून दिला. डी. डी.सोनवणे पाठक यांनी उपस्थितांना संदेश दिला.
यावेळी प्रा. शुभांगी कुंभार, प्रा. सुलक्षणा गायकवाड, प्राचार्या मनोरमा काठे,माजी प्राचार्य एस.एस. भिंगारदिवे, माजी प्राचार्या रत्नप्रभा काकडे, कु. श्रद्धा पवार,प्रा शिंदे सर, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथील श्री.दहिफळे सर तसेच डॉ. कमर सुरूर यांनी दिपा भालेराव यांच्यासोबत केलेल्या कार्याचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. त्यांच्या कार्यपद्धती, विद्यार्थिनींशी असलेले आपुलकीचे नाते आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला.
सत्कारमूर्ती दिपा भालेराव यांचा परिचय प्रा.योगेश विलायते यांनी करून दिला. त्यानंतर सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले. सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयाच्या वतीने दिपा भालेराव यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती मनीषा पवार होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात दिपा भालेराव यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सेवापूर्ती हा केवळ निरोपाचा क्षण नसून, आयुष्यभर केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या योगदानाची कृतज्ञतेने दखल घेण्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिबेका चांदेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद चंदेल यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com