पारंपरिक वेशभूषेतून जपली संस्कृती; नगरसेविका गौरी बोरकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान
नगर : महिलांचा आत्मविश्वास, जिद्द आणि सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या ‘नारी शक्ती बुलेट राईड २०२६’ या स्पर्धेत सौ. पूर्वा अवधूत गुपेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत त्यांनी या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. नगरसेविका सौ. गौरी अजिंक्य बोरकर यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगरच्या रस्त्यांवर आयोजित या बुलेट राईडच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा आणि आत्मविश्वासाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. दुचाकी चालविण्याचे कौशल्य, पारंपरिक वेशभूषा आणि उत्स्फूर्त सहभाग यांमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिकतेची कास धरतानाच भारतीय संस्कृती आणि परंपरा जपण्याचा संदेशही या स्पर्धेतून देण्यात आला.
महिला केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यापुरत्या मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात, हे अशा उपक्रमांतून अधोरेखित होते. बुलेट राईडसारख्या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढणे ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सौ. पूर्वा अवधूत गुपेकर यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्साह वाढला. महिलांचे सामर्थ्य, संस्कृतीप्रेम आणि आत्मविश्वास यांचा संगम घडविणारी ही बुलेट राईड अहिल्यानगरमध्ये नारीशक्तीची नवी ओळख निर्माण करणारी ठरली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com