महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त समर्थ प्रशालेत व्याख्यान सोहळा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त समर्थ प्रशालेत व्याख्यान सोहळा



नगर : दर्शक ।  श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे पदाधिकारी आणि शालेय समितीचे चेअरमन आदरणीय श्री. सुरेश क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.



      कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर, शालेय समितीचे चेअरमन श्री. सुरेश क्षीरसागर, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी सौ. गीतांजली शेरकर उपस्थित होते.



        या प्रसंगी व्याख्याते श्री. गणेश पारधे व श्री. अथर्व ढोरकुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक कार्य आणि समाजसुधारणेसाठी केलेले प्रयत्न यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.



       प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर यांनीही महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विषयावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला.



       कार्यक्रमाच्या शेवटी सौ. संपदा जोशी यांनी उपस्थित मान्यवर व व्याख्याते यांचे आभार मानले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्याख्यान शांतपणे ऐकून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.