Ahmednagar Varkari: नूतन अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) - राज्याचे विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश यांची राज्य फोर्स वन अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत, सतीश राऊत, सुभाष राऊत, चैतन्य राऊत आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विश्वनाथ राऊत म्हणाले, नगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक म्हणून कृष्णप्रकाश यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. आपल्या सिंघम स्टाईलने धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारीला आळा बसविला. नगरचे आणि त्यांचे आजही जिव्हाळ्याचे संबंधी आहेत. त्यांच्या कार्यत्परतेमुळेच त्यांना राज्यातील विविध महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. आताही अप्पर पोलिस महासंचालकपदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या चांगल्या कार्याची पावती असून, पुढील काळातही त्यांचे अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील, अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कृष्णप्रकाश यांनीही नगरमधील जुन्या आठवणींना उजाळ देत नगरमधील मित्र परिवारांची विचारपुस केली. लवकरच नगरला येवून सर्वांशी संवाद साधू, असे सुतावाच केले.
-compressed.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com