अहमदनगर (प्रतिनिधी) - भगवान श्री सत्यसाई बाबांच्या मातोश्री ईश्वराम्मा यांचा स्मृतीदिन नगरच्या सत्यसाई सेवा समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 25 संस्कारक्षम प्रबोधानात्मक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात 150 मुला-मुलींनी या सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. श्री.अशोक कुरापाटी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गणेश श्रीकृष्ण-राधेसह गोपिंकांच्या वेशातील बालगोपालांनी श्रीकृष्ण भजनासह गणेश वंदना नृत्य सादर केले. श्री श्रमिकनगर येथील मार्कंडेय विद्यार्थ्यांच्या वेदसार मंत्र, गायत्री मंत्र व महिषासुर स्त्रोत पठण केले. पुष्पांजली नृत्य, देवी नृत्य, जोगवा, राजस्थानी नृत्य, नटराज, स्वच्छतेचा संदेश व मुलगी वाचवा संदेशाच्या गीतावर विविध नृत्य सादर करण्यात आली. साईबाबा, पंडित नेहरु, भ्रुणहत्या, मुलगी वाचवा, झाशीची राणी, विविध प्रांतीय, धर्मिय संत, जिजामाता, महागाई, मुक्ताबा, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, रक्तदान, ध्रुवतारा, लोकमान्य टिळक, सिंधूताई सपकाळ, पुस्तके, भाजीवाली आदिंची व्यक्तीरेखा सादर करुन विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक संदेश दिले.
शिर्डीचे साईबाबा व सत्यसाईबाबांच्या जीवनकार्य व शिकवणूकीवरील सादर केलेले नाट्य सादरीकरण सर्वांच्या मनावर बिंबवून अंतर्मुख केले. साईबाबांच्या आरती विभुती प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शालाबाह्य संस्कारक्षम उपक्रमांसाठी धडपडणार्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक कुरापाटी यांनी भगवान बाबांच्या अलौकिक मानवी सेवा कार्याची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमांची रचना सौ.विद्या दगडे, सौ.वैशाली वरुडे, श्रीमती सुरेखा डावरे, सौ.सुप्रिया ओगले-जोशी, सौ.वर्षा पंडित, वैष्णवी कुलकर्णी, करिष्मा कोठारी-जोशी, प्राजक्ता लोखंडे आदिंनी केली. सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. यावेळी पालक-विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com